सांस्कृतिक कार्य विभाग

महाराष्ट्र शासन

Shri Devendra Fadnavis

श्री. देवेंद्र फडणवीस

माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन

Shri Eknath Shinde

श्री. एकनाथ शिंदे

माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन

Shrimati Sunetra Pawar

श्रीमती. सुनेत्रा अजित पवार

माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन

Adv. Ashish Shelar

ॲड. आशिष शेलार

माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री

Dr. Kiran Kulkarni

डॉ. किरण कुलकर्णी

माननीय सचिव

ताज्या घडामोडी

सेवा जेष्ठता यादी २०२६ यादी पाहण्यासाठी क्लिक करा

आमच्याविषयी

पुराभिलेख संचालनालय

इतिहास आणि संस्कृती जतन करणे हे पुराभिलेख संचालनालयाचे प्रमुख काम. आजतागायत राजकीय, प्रशासनिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक इत्यादी क्षेत्रात ज्या ज्या सुधारणा झाल्या व या क्षेत्रात कसकशी प्रगती होत गेली याबाबतचे समग्र दर्शन पुराभिलेख संचालनालय घडविते. संचालनालयाचे मुख्य कार्यालय मुंबई येथे असून पुणे, कोल्हापूर, नागपूर व छत्रपती संभाजी नगर येथे विभागीय कार्यालये आहेत. पुराभिलेख संचालनालय या नावाने ओळखला जाणारा हा विभाग महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहे.

अभिलेख हे मुद्दाम तयार होत नाहीत किंवा ते जाणीवपूर्वक निर्माण केले जात नाहीत. ते एखादया कार्याच्या, क्रियेच्या किंवा घटनेच्या अनुषंगाने आपोआपच निर्माण होतात. अभिलेख मानवाच्या गरजेतून निर्माण होतो. तो निर्माण करताना त्याचे महत्त्व लक्षात येत नाही पण काही कालानंतर त्याचे महत्त्व दिसून येते.

अभिलेखागारे किंवा दप्तरखाने हे आता केवळ जुनी दप्तरे संग्रहीत करणारे किंवा जपून ठेवणारे विभाग राहिलेले नाहीत. अभिलेखागारात संग्रहीत केलल्या संदर्भ साधनांचा उल्लेख केल्याशिवाय प्रशासनाची पुढील वाटचाल होणे केवळ अशक्य आहे. सामान्य माणूस आपल्या हक्कासाठी केवळ अभिलेखागारातील संदर्भ साधनांचा वापर करु शकतो. कोणत्याही राष्ट्राचा इतिहास दप्तरखान्यांन शिवाय लिहिला जाऊ शकत नाही.आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा भावी पिढिसाठी जतन करण्याचे बहूमोल कार्य केवळ आपली अभिलेखागारेच करीत आहेत.

राज्यगीत डाउनलोड करा